रावेरशैक्षणिकसामाजिक

10 वी व 12 वीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार

रावेर तालुक्यातील वाघाडी येथील स्तुत्य उपक्रम

गोलवाडे, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज जीवन महाजन | रावेर तालुक्यातील वाघाडी येथील 10 वी व 12 वीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वाघाडी येथे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शिवप्रतिष्ठाण ग्रुप व मा. पं.स.सदस्य दिपक पाटील यांच्या वतीने 10 वी व 12 वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गावातील जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.

10 वी 12 वी नंतरच खऱ्या अर्थाने विध्यार्थी आपल भविष्य घडवू शकतात. म्हणून पुढील शिक्षणासाठी प्रोहत्सान मिळावे. यासाठी दरवर्षी वाघाडी येथे शिवप्रतिष्ठान ग्रुप तर्फे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. यावेळी सुद्धा सत्कार करण्यात आला. मा.पं.स.सदस्य दिपक पाटील, मुरलीधर चौधरी, उपसरपंच राजेंद्र महाजन, सीताराम महाजन, बाळू पाटील, दामोदर महाजन, जवाहरलाल महाजन, मधुकर पाटील, राहुल चौधरी, सुभाष महाजन, विठ्ठल महाजन, गणेश पाटील महाराज, बाळू कोळी गावातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!