हरिण अचानक शिरले घरात , कुटुंबाची उडाली तारांबळ, रावेर तालुक्यातील घटना
सावदा ,ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एरवी जंगलात राहणारे हरिण गावात येऊन अचानक सकाळी सकाळी घरात घुसल्याने कुटुंबाची हरिण घरात आल्याचे पाहून तारांबळ उडाली. ही घटना रावेर तालुक्यातील वडगाव या गावाची.
दिनांक.३ जून २०२५ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील वडगाव या गावातील मेहबूब तडवी यांच्या घरात हरीण(चितळ )अचानक शिरल्याने तडवी परिवाराची तारांबळ उडाली. ही घटना गावात माहिती पडताच गावात एकच खळबळ उडाली.
यावेळी मेहबूब तडवी व त्याच बरोबर पोलीस पाटील संजय वाघोदे व ग्रामस्थांनी तात्काळ निंभोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री.हरिदास बोचरे व पोलिसांना माहिती दिल्याने तात्काळ पोलिसांनी भेट देऊन तसेच वनविभाग यांच्याशी संपर्क साधून या बाबत माहिती दिली.
वडगाव ता. रावेर येथे सकाळीच ५ वा. चे सुमारास अचानक हरिण शिरल्याने खळबळ उडाली होती याबाबतीत लागलीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत तसेच रावेर वनविभागाच्या रावेर राऊंड स्टाफ ने हरिण (चितळ )वन्य प्राण्याला रेस्क्यू केले तसेच ३ तासानंतर वडगाव येथून वन विभागाने हरिणाला ताब्यात घेऊन सदर वन्य प्राण्याची शारीरिक स्थिती तपासून लालमाती धरण परिसरात सुस्थितीत सोडण्यात आले.
सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जगदीश जगदाळे, वनरक्षक आयेशा पिंजारी, वनरक्षक कियारसिंग बारेला,वाहन चालक विनोद पाटील यांनी केली.


