अल्पवयीन मुलीचा विनयभंग : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, मुक्ताईनगर मधील घटना
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पीडितेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील अल्पवयीन मुलगी व आरोपी यांची घरे जवळ असल्याने व ओळखीचे असल्याने आरोपी याने पीडित मुलीच्या बहिणीला फोन करून त्या मुलीशी काम असल्याने पाठविण्यास सांगितले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी 3 जून रोजी दुपारी 03:05 मिनिटांनी भेटीला गेली व तेथे अविनाश वानखेडे याच्याशी काही वेळा चर्चा करून दुपारी 03:30 मिनिटांनी घरी परतत होती. घरातून बाहेर निघत असताना दरवाजा मध्येच अविनाश वानखेडे हेमंत पराडकर व सुमित मेढे अशा तिघांनी पीडित मुलीला अडवलं आणि काहींनी पीडितेचे तोंड दाबून अविनाश वानखेडे याने बळजबरी शरीर संबंध सुरू केले. याची व्हिडिओ शूटिंग सुमित मेढे हा करीत होता. काही वेळानंतर या तिघांनी सोडले असता अल्पवयीन मुलगी घरी गेली व घरी तिच्या बहिणीची वाट पाहू लागली.
तिची बहीण घरी आल्यानंतर त्या बहिणीला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर मुक्ताईनगर पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालीअसुन पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास एपीआय राजेंद्र चाटे हे करीत आहेत.