भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकमुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगरमध्ये खामगावच्या धर्तीवर नवरात्रोत्सवाला प्रारंभ! मुक्ताई जगदंबा महिला मंडळाचा अनोखा धार्मिक उपक्रम; कोजागिरी पौर्णिमेपासून उत्सवाला सुरुवात

मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके || मुक्ताईनगर येथे मुक्ताई जगदंबा महिला मंडळातर्फे खामगावच्या धर्तीवर कोजागिरी पौर्णिमेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. मंडळाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


मुक्ताई जगदंबा महिला मंडळाच्या वतीने धार्मिक परंपरा जपत हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, देवीची आराधना आणि भक्तिमय वातावरणातून नवरात्रोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे.


खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमेपासून नवरात्रोत्सव सुरू करण्याच्या परंपरेच्या धर्तीवर मुक्ताईनगरमध्येही हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


या उपक्रमामुळे महिलांच्या धार्मिक सहभागाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच परिसरातील भाविकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. मुक्ताई जगदंबा महिला मंडळाच्या या धार्मिक उपक्रमाचे परिसरातून स्वागत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!