भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडा

डॉ. बाबा साहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या बद्दल सोशल मीडिया वर आक्षेपार्ह व्यक्ताचा वक्तव्य,चोपड्यात आंबेडकरी समाजाचा निषेध मोर्चा

चोपडा. मंडे टु मंडे न्युज.प्रतिनिधी.सचिन पाटील || भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या बद्दल इन्स्टाग्रामवर वर कथितरीत्या अपशब्द वापरल्याच्या घटनेच्या निषेधार्थ चोपडा शहरातील आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर समाज बांधवांनी शासकीय विश्रामगृहापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड मार्ग चोपडा शहर पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला या मोर्चा तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान संबंधित संघटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना निवेदन देण्यात आले संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या बद्दल आक्षेपाय वक्तव्य केल्याने समाज बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे सोशल मीडियाचा वापर करताना महापुरुषाविषयी आदर राखावा आणि सामाजिक सलोखा बिघडविंणार्या प्रकारांना आळा घालावा अशी भूमिका मोर्चातील सहभागांनी बांधवांनी मांडली या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

25 ऑक्टोंबर रोजी दुर्गेश उर्फ मुन्ना पाटील राहणार अरुण नगर चोपडा यांने मोबाईल व्हाट्सअप द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्याबद्दल अस्शिल भाषेत पाहिजे बोलल्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!