गोदामात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || गोदामात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर चोपडा शहर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. हा कुंटणखाना चोपडा शहरालगतच्या धनवाडी शिवारात सुरू होता.बीया प्रकरणी कुंटणखाना चालविल्याच्या आरोपावरून जगन्नाथ जानकीराम महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
धनवाडी शिवारातील एका शेडमध्ये असलेल्या गोदामात छुप्या पद्धतीने अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळावरून जगन्नाथ जानकीराम महाजन याला ताब्यात घेतले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कुंटणखाना चालविल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
चोपडा शहराच्या जवळच असलेल्या धनवाडी शिवारातील गोदामात कथित अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधातील कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


