हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालकांचे धाबे दणाणले, आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सर्व प्रकारच्या खाद्य आस्थापनांसाठी कडक नियमावली जारी केली आहे. ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक करण्यात आले असून, अस्वच्छता आढळल्यास किंवा नियम न पाळल्यास परवाना रद्द करून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित व पिण्यायोग्य पाणी मोफत देणे बंधनकारक आहे. ग्राहकांना विकतचे मिनरल वॉटर घेण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच सर्व आस्थापनांनी FSSAI चा वैध परवाना दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ असणे गरजेचे आहे.कॅलरी व माहिती प्रदर्शन: मेनू कार्डवर पदार्थांमधील घटक, त्याचे पौष्टिक मूल्य (Nutrition) आणि ॲलर्जीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कामगारांचे नियमित वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र (Medical fitness) असणे अनिवार्य आहे. वापरलेले खाद्यतेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरण्यास बंदी असून, नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.हा आदेश राज्यातील सर्व हॉटेल्स, ढाबे, कँटीन, केटरर्स आणि क्लाउड किचनला लागू आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील सुमारे ४.५ लाख आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल.असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल धारकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. हे नियमांचं पालन करणं हॉटेल, रेस्टॉरंट आणि तत्सम आस्थापनांसाठी बंधनकारक असणार आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी ही नियमावली जाहीर करण्यात आल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
अन्न आणि औषध प्रशासनाची नवी मोहीम…
एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले, २०११ पासून फूड सेफ्टीचे काही नियम आहेत. त्या कायद्याअंतर्गत मी काम करतो. अन्न पौष्टिक असावं आणि सुरक्षित असावं ही जबाबदारी आमच्या विभागाची असते. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हॉटेल आणि उपहारगृह. या आस्थापनांकडून कायद्याचं पालन होतं की नाही हे महत्त्वाचं आहे. २३ जून रोजी यासंदर्भात एक आदेश पारित करण्यात आला आहे. परवाने अनिवार्य आहेत. त्याचं पालन झालं आहे. अन्न तयार करणं, लेबलिंग, पॅकेजिंग याचे नियम आहेत. अंमलबजावणी गरजेजी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत कारवाई केली तेव्हा गंभीर त्रुटी आढळून आल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. साफसफाई नसणे, तेलाचा सारखा वापर करणं, तापमान नियंत्रणातील त्रुटी, सुरक्षित पाणी नसणं अशा बऱ्याच गोष्टी आढळून आल्या. त्यामुळे पुन्हा आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही मोहीम कायमस्वरुपी चालणार आहे.
हॉटेल-उपहारगृहांसाठी नवी नियमावली…
हॉटेल, उपहारगृह, कँटीन, ढाबे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट यांना परवाने असणं महत्त्वाचं आहे.
स्वच्छता आणि आरोग्याचे नियम पाळणे गरजेचे आहेत.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. अन्यथा संसर्ग होण्याची भीती असते.
गरम व थंड अन्नसाठी तापमान नियंत्रणात ठेवणे
ग्राहकांना मोफत आणि पिण्यायोग्य पाणी देणं अनिवार्य, यासाठी संबंधित बोर्ड लावले पाहिजेत.
मेन्यू, लेबलिंग, मेन्यूमध्ये कॅलरी, nutrients आणि allergy ची माहिती देणं अनिवार्य
FASSAI च्या Roko नियमांचं पालन करणं महत्वाचं
वापरलेलं तेल हे डिस्पोज करावे.
५० कोटींच्या वर उत्पन्न असलेल्या आस्थापन्नांचं ऑडिट करणं महत्त्वाचं, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार
किचन कसं असावं?
- भिंती आणि फरशांना टाईल्स असावेत.
- वॉशेबल असावे.
- चिमनी, आणि एग्जॉस्ट फॅन असणं महत्त्वाचं
- कच्चामाल ठेवण्यासाठी वेगळी मांडणी असणं अनिवार्य
- शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवणे अनिवार्य
- ग्राहकांसाठी हॅन्डटॉवल असणं महत्त्वाचं
- पेस्ट कंट्रोल करणं महत्त्वाचं
- इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावे
- झुरळ, पाल किचनमध्ये नसली पाहिजे
- गरम जेवण म्हणजे ६० डिग्री असलं पाहिजे, थंड म्हणजे ४ डिग्री आणि फ्रोझन म्हणजे -१८ डिग्री असलं पाहिजे.


