निंभोरा येथे पठाणकोटला थांबा द्या ~ मागणी
निंभोरा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील गावातील लोकसंख्या अंदाजे २० ते २५ हजार पर्यंत असून निंभोरा स्टेशन ला जवळपास २० ते २२ खेडी लागून आहेत या गावातील लोकांचा व्यापार शेती, शिक्षण, केळी निर्यात यासाठी गावात सततचा संपर्क येत असतो. रावेर तालुक्यातील सुमारे तिसरा हिस्सा केळी उत्पादन निंभोरा रेल्वे स्टेशन वरून निघतो मात्र येथे कोरोना काळापासून दादर अमृतसर एक्सप्रेस चा थांबा बंद केल्याने व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत आहे तरी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश कालीन या थांब्याला पुन्हा पूर्ववत सुरू करावे अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
या गावात राष्ट्रीयकृत बँका, पोलीस ठाणे, वीज वितरण कंपनीचे कार्यालय, केळी व्यापार, शिक्षण तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या चाकरमान्याची संख्या ही लक्षणीय आहे मात्र लांब पल्ल्याची एकमेव असलेली पठाणकोट एक्सप्रेस ही बंद केल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होते व अति महत्त्वाच्या कामाचा खोळंबा होतो वेळेवर वैद्यकीय उपचार होऊ शकत नसल्याने गरिबांना भाडोत्री वाहनाने जावे लागते व ते त्यांना परवडत नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तसेच मुंबई येथील जनरल मॅनेजर यांनी निंभोरा येथे पाहणी दौऱ्यादरम्यान काही समाजसेवी संघटनांनी निवेदन ही दिले होते. त्याचबरोबर गावातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांना सुद्धा पठाणकोट ला थांबा मिळावा म्हणून मागणी केली आहे. या मागणीकडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लक्ष देत जनमानसाच्या महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा व वरिष्ठांकडे ही मागणी लावून धरावी. अशी परिसरातील ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

