भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; ७.११६ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, गांजा, कार, मोटारसायकल आणि मोबाईल फोनसह एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता लासूर–हातेड मार्गावरील पाटचारीजवळ चोपडा ग्रामीण पोलीस गस्त घालत असताना संशयित कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात लपवून ठेवलेला ७.११६ किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहनातील तिघांना ताब्यात घेतले.


अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
या कारवाईत १ लाख ७७ हजार ९०० रुपयांचा गांजा, ३ लाख रुपयांची हुंडाई सॅन्ट्रो कार, ९० हजार रुपयांची पल्सर मोटारसायकल तसेच ४१ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम २०(ब) व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा सखोल तपास सुरू आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अशा धडक कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येतील, असा निर्धार जळगाव जिल्हा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!