क्राईमरावेर

रावेर मध्ये गुटखा तस्करावर कारवाई

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर येथील बसस्थानक परिसरातून राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे एक लाख रुपये किंमतीचा विमल गुटखा रमेश रुपचंद पाटील रा.पारोळा यांचे कडून पोलिसांनी जप्त केला.

रावेर येथील बसस्थानक परिसरात मंगळवार रोजी सुमारे ११ ते ११.३० च्या सुमारास झाड़ा खाली एक ईसम पांढऱ्या रेक्झिन च्या पिशव्या घेऊन बसलेला गस्तिवरिल पोलिसाला आढलुन आला असता त्याची हालचाल संशयास्पद दिसल्याने पोलीसानी त्याची चौकशी करून तपासणी केली असता त्याच्या जवळ १ लाख ३ हजार ,५०० रुपए किमतीचा गुटखा आधळून आला हा गुटखा पारोळा येथे विक्रीसाठी नेत असल्याचे त्याने कबूल केले तसेच हा गुटखा बऱ्हाणपूर येथील आशिष इंटरप्राएझेस चे मालक प्रितेश शेट याच्याकडून विकत घेतल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या जवळून १ लाख ३ हजार ५०० रुपए किमतीचा गुटखा जप्त करून त्यांचेवर रावेर पोलिससस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!