भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी बु.येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गावात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ तसेच गुन्हेगारी रोखता यावी. यासाठी काही वर्षांपूर्वी येथील ग्रामपंचायतीकडून लोक वर्गणीच्या माध्यमातून गावात ४ ते ५ सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण सिसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत पडलेले दिसत आहेत. परिणामी गावाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐणीवर आला आहे.

खिर्डी हे परिसरातील गावांची मोठी बाजारपेठ असून दर मंगळवारी आठवडे बाजार याठिकाणी भरत असतो तसेच या ठिकाणी मोठे व्यापारीवर्गासह शाळा, कॉलेज, बॅंक, तसेच बसस्थानक परिसरात अनेक लहान मोठी कीराणा दुकाने व शेतकरीबांधव तसेच या भागात सतत नागरिकांची वर्दळ असल्याने पाकीट व मोबाईल चोऱ्या, अन्य मोठ्या प्रकारच्या चोरीच्या घटना घडू नये, यासाठी विविध ठिकाणी ग्रामपंचायती मार्फत लोकवर्गणीतून सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र सदरील सिसीटीव्ही कॅमेरा हा नागरिकांचा तिसरा डोळा म्हणून काम पाहत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला महत्त्वाचा हातभार लागुन मोठी मदत होत असतांना दिसून येत होती; परंतु सध्या ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून गावात बसविण्यात आलेल्या सिसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त बंद अवस्थेत पडल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सिसीटीव्ही बंद असल्याबाबत विचारले असता संपूर्ण सिसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे बंद अवस्थेत आहे. तसेच सबंधित प्रशासनाने बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिक,व्यापारी व शेतकरी बांधवांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!