भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

रेल्वे प्रवाशांना दिवाळीत दिलासा! मध्य रेल्वे धाववणार अतिरिक्त विशेष गाड्या; भुसावळ, जळगावसह अनेक स्थानकांवर थांबे

भुसावळ : मंडे टु मंडे न्युज | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर-मुंबई मार्गावर अतिरिक्त दिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांना भुसावळ, जळगाव, मलकापूर, शेगाव, अकोला यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मुंबई-नागपूर प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

१) लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडी (८ सेवा)

गाडी क्रमांक 01083 लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष ही गाडी ६, ८, ११ आणि १३ नोव्हेंबर २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ५.०५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 01084 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही गाडी ५, ७, १० आणि १२ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबे देण्यात आले आहेत.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी (४ सेवा)

गाडी क्रमांक 01085 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष ही गाडी ७ आणि ९ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 01086 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ही गाडी ८ आणि १० नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

भुसावळ-जळगावच्या प्रवाशांना विशेष फायदा

दिवाळीच्या काळात मुंबई आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या अतिरिक्त विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबे असल्याने खान्देशातील प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!