Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

raver

सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचा ११२ वा वर्धापन दिन व पाठ उत्सव धूमधडाक्यात साजरा

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | सावदा येथील स्वामीनारायण मंदिर मंदिराचा ११२ वर्धापन दिन व पाठ उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.परम पूज्य शास्त्री स्वामी धर्मस्वरूपदासजी हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते .

आला.परम पूज्य शास्त्री स्वामी धर्मस्वरूपदासजी यांनी वक्तव्यात त्यांनी उपस्थित सर्व हरिभक्तांना प्रतिपादन केले ,
स्वामिनारायण मंदिर सावदा चा हा ११२ वा वर्धापन दिन या निमित्ताने बोलताना ते म्हणाले ,” मंदिर ही संस्कारांची राजधानी असते . एका पिढीने दुसऱ्या पिढीमध्ये संस्कार संक्रमित करावयाचे असतात . आणि ही संस्कार संक्रमित करावयाचे मुख्य ठिकाण म्हणजे सनातन संस्कृतीमधील ही मंदिरं .
या मंदिरामध्ये नवीन पिढी संस्कार घेत असते व जुनी पिढी मिळालेल्या संस्कारांच्या आधारे मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर होत असते . त्यामुळे समाजातील प्रत्येक तबक्यातील जनसामान्यांनी मंदिरामध्ये नियमित दर्शनास्तव यावे व आपला मोक्ष मार्ग प्रशस्त करावा . “

सकाळी सात वाजता भगवंताचा अभिषेक संपन्न झाला तदनंतर सत्संग सभा झाली या सत्संग सभेमध्ये गाव गाऊन आलेले हरिभक्त उपस्थित होते तदनंतर अन्नकोट दर्शन व महाआरती होऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सदर महोत्सवाची यजमानपद श्री जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे व श्री अशोक प्रेमचंद नेमाडे या दोघ बंधूंनी परिवार यांनी घेतले होते .

परम पूज्य आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री यांनी आपल्या वक्तव्यातून सनातन संस्कृतीमध्ये मठ मंदिर हे समाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात आणि सर्व समाजाला एकोपा शिकवत असतात धर्मो रक्षति रक्षतः आपण जर धर्माचे रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो असे प्रतिपादन त्यांनी आपल्या वक्तव्यात केले.

परम पूज्य महामंडलेश्वर पवन कुमार दास जी महाराज यांनी आपल्या वक्तव्या भगवान एक है उसके स्वरूप अलग अलग है आप किसी भी स्वरूप को भेजीये व सभी नमस्कार एक ही भगवान को प्राप्त होते है भगवान एक है उसके स्वरूप अलग अलग है.

श्री स्वामीनारायण गुरुकुल चे उपाध्यक्ष शास्त्री स्वामी अनंत प्रकाश डासजी व शास्त्री स्वामी विश्वप्रकाश दास जी यांनी आपली आशीर्वाचना प्रदान केली. यजमान परिवार श्री जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे व अशोक प्रेमचंद नेमाडे यांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला
आभार प्रदर्शन शास्त्री स्वामी भक्तीप्रिया दास जी यांनी मानले
सूत्रसंचालन नंदू पाटील सर यांनी केले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!