Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसावदा

तापी काठ परिसरातील ११ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी फोडल्या : १२४ किलो तांब्याची तार लंपास, लाखांचे नुकसान

सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज ||  रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी शेतकऱ्यांना लक्ष्य केले असून, उदळी खुर्द परिसरात तापी नदीकाठावरील तब्बल ११ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत मोटारींचे सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी किरण पांडुरंग पाटील. वय ५१, रा. दसनूर.तत.रावेर. यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, तासखेडा शिवारातील तापी नदीच्या काठावर त्यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांनी शेतीसाठी विद्युत मोटारी बसविल्या होत्या. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० ते १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या मोटारींची तोडफोड केली.

चोरट्यांनी मोटारींमधील तब्बल १२४ किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली. याशिवाय मोटारींचे तसेच अॅल्युमिनियम तारांचेही नुकसान केले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शेतीच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारींचे नुकसान झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या प्रकरणी किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय पोहेकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!