Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राइममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात फटाक्यांच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; हजारो रुपयांचे फटाके लंपास! दिवाळीच्या सणात चोरीची घटना उघडकीस

मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके || दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच मुक्ताईनगर शहरात फटाक्यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानातील तब्बल ६० हजार २०० रुपये किमतीचे फटाके चोरून नेल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या दुकानात ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानातील हेड शॉट आणि स्टँडर्ड कंपनीचे स्काय शॉट असे विविध प्रकारचे फटाके लंपास केले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ४५ हजार ६०० रुपये किमतीचे २४ नग हेड शॉट फटाके, तसेच १४ हजार ६०० रुपये किमतीचे १५ नग स्टँडर्ड कंपनीचे स्काय शॉट फटाके यांचा समावेश आहे. अशा एकूण ६० हजार २०० रुपयांच्या फटाक्यांची चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी १० नोव्हेंबर २०२६ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश आनंदा मेढे करीत आहेत.

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात फटाक्यांच्या दुकानातच चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान आता मुक्ताईनगर पोलिसांसमोर आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!