ग्राइंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार : २३ वर्षीय तरुणाचा खून ; रावेर तालुक्यात खळबळ
भोर. रावेर.मंडे टु मंडे न्युज . विकास धनगर .|| तालुक्यातील केऱ्हाळे गावातील इंदिरानगर परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी घडली. रामसिंग भिल (वय ६२) याने राजू कापडे (वय २३) याच्या गळ्यावर ग्राइंडर मशीनच्या कटरने वार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात राजूचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंग भिल हा मिस्तरी काम करतो आणि केहऱ्हाळे येथील इंदिरानगर परिसरात एकटाच राहत असल्याचे सांगण्यात येते. मृत राजू कापडे हा त्याला जेवणाचा डबा आणून देत असल्याची माहिती आहे.मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास राजू हा रामसिंगच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील रहिवासी राजू कापडे आणि रामसिंग भील यांच्यात मस्करीत दगड मारण्यावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शिवीगाळ आणि बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि त्याचे पर्यवसान रक्तरंजित संघर्षात झाले. या वादाच्या भरात संशयित रामसिंग भील याने राजू कापडे याच्यावर याच दरम्यान रामसिंगने मिस्तरी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मशीनच्या कटरने राजूच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात राजू कापडे याच्या मानेवर खोलवर व गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच/उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी रावेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वादाचे नेमके कारण, हत्येचा घटनाक्रम तसेच घटनेतील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे केहऱ्हाळे गावातील इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे.


