भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

भरधाव डंपर ने ट्रॅक्टरला कट मारल्याने ट्रॅक्टर पलटी, १ ठार ३ गंभीर जखमी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भरघाव डंपर ने ट्रॅक्टरला कट मारल्याने ट्रॅक्टर पलटी झाल्याने १ जण जागीच ठार झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार दि. २५ जानेवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात दूध फेडरेशन जवळ घडली. भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत अंकुश आत्माराम भिल (वय-२७, रा. डिकसाई ता. जळगाव. हा तरुण जागीच ठार झाला तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

शनिवारी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २९०६) ने अंकुश भील याच्यासह सुनील मधुकर भिल (वय-२२), गणेश भगीरथ भिल (वय-१८), आणि शुभम सुका भिल (वय -२०, तिघे रा. विदगाव ता. जळगाव) विटा घेऊन जात होते.

जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून जात असताना तेथील वळण जवळ मागून येणाऱ्या भरधाव डंपरने ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला धडक दिली. तेवढ्यात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल, गणेश भगीरथ भिल, शुभम सुका भिल हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते.(केसीएन)या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रुग्णालयात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने व ३ मुले पितृप्रेमाला पोरकी झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!