बोदवळ

बोदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून प्रथम आलेल्या वेदांत जोगी याचा गौरव

मुक्ताईनग, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकाने फिटर शाखेतील वेदांत संदीप जोगी याचा मान्यवरांच्या हस्ते मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला.

बोदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा १७ सप्टेंबर रविवारी दीक्षांत समारंभ सोहळा व पीएम रन स्किल अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या. दीक्षांत समारंभामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकाने फिटर शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत संदीप जोगी याचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला. सोहळ्याप्रसंगी यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

फिटर या शाखेमध्ये शिक्षण घेत असताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथील प्राचार्य, गटनिदेशक, सर्व शिक्षक तसेच फिटरचे निदेशक एम. वाय. पुनासे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात दोन वर्षांमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असे मत संस्थेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत जोगी याने सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना आयटीआय चे गट निदेशक ए. जे. कोल्हे यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी यापुढे यशाने हुरहुडन न जाता पुढील यश संपादन करा. आपणास मिळालेले कौशल्य भविष्यात बळ देणार असून कौशल्य आत्मसात करा येणाऱ्या काळात आपणास भरपूर शिकायला मिळणार  असून याचा नक्कीच फायदा होईल. उद्योजक तसेच नोकरी व्यवसायात आपण नाव कमवावे असा आशा वाद त्यांनी व्यक्त केला.

दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे चेअरमन हरीओम जयस्वाल हे होते. व्यासपीठावर नाडगाव ग्रामपंचायत च्या सरपंच अश्विनी कुरपाडे, मुक्ताईनगर पत्रकार संघाचे सचिव संदीप जोगी, श्री कुरपाडे, संस्थेचे गट निदेशक ए. जे. कोल्हे, प्राचार्य अरविंद चौधरी, कर्मचारी यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन निदेशक के जे सोनवणे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!