विशाल दांडगे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड
पाडळसा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात विशाल दांडगे यांची यावल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे राज्य प्रदेशाध्यक्ष गोविंदा वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय साकडा यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश वाय दुसाने यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद भाऊ कोळी (शिवा भाई जी), ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कोळी, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अनिल आसेकर, रावेर तालुका अध्यक्ष विजय शामराव अवसरमल, रावेर शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत वैदकर, रावेर शहर सचिव दिनेश सैमिरे आणि समाजसेवक अजय पाटील (भुसावळ) यांच्या हस्ते विशाल दांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच, भालोद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जतीन मेढे, दिव्यांग सेना जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, यावल तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, तालुका सचिव चेतन तळेले यांनीही विशाल दांडगे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे यावल तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.