खडसेंचे पुनर्वसन; कॅबिनेटमंत्री पदाचा दर्जा ?
मुंबई (प्रतिनिधी)। माजी महसूल मंत्री भाजपचे नेते एकनाथराव खडसे आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणारअसल्याचे निश्चित झाले असून खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशानंतर कोणती जबाबदारी मिळणार या बाबत चर्चा सुरू असून ,त्यांना मंत्री पद मिळणार का? खडसेंचे पुनर्वसन करणे राष्ट्रवादी साठी मोठी जबाबदारी असून एकनाथराव खडसे यांना कृषी मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे.
मात्र समोर आलेल्या माहिती नुसार शिवसेना कृषी मंत्रीपद सोडायला तयार नाही. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड देखील गृहनिर्माण मंत्रीपदावर अडून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खडसे यांच्याबाबत राष्ट्रवादीत आटापिटा सुरु झाले आहे. दरम्यान एकनाथराव खडसे यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याबाबत राष्ट्रवादीत हालचाली सुरु असून एकनाथराव खडसे यांची नियोजन मंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. नियोजन मंडळाच्या अध्यक्ष पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. नियोजन मंडळात कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करून खडसे यांना ती जबाबदारी देण्याचीही तयारी राष्ट्रवादीकडून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

