Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; चौघांना अटक! किन्ही एमआयडीसी परिसरात पहाटे पोलिसांचा छापा; ७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, भुसावळ तालुका पोलिसांनी किन्ही एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) पहाटे २.५५ वाजता टाकलेल्या छाप्यात ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणी कंडारीसह भुसावळ शहरातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एमडी ड्रग्जसह दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेट असा एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे.

असगरखानकडून ५५.३३ ग्रॅम एमडी जप्त

पोलिसांच्या झडतीदरम्यान एकूण ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन पावडर आढळून आली. या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असल्याचे सांगण्यात आले. यापैकी सर्वाधिक ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान याच्याकडून जप्त करण्यात आले.

याशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेट आणि पल्सर या दोन मोटारसायकली (किंमत ३ लाख २५ हजार रुपये), तसेच आयफोन १६, आयफोन १३, टेक्नो आणि रेडमी कंपनीचे चार मोबाईल (किंमत १ लाख ५५ हजार रुपये) पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

चौघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी ऋषभ कुणाल खेडकर (वय १८, रा. कंडारी, भुसावळ), प्रथमेश दिलीप आव्हाड (वय २७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (वय २६, रा. नसरवांजी फाईल, भुसावळ) आणि असगरखान अनवरखान (वय ५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) या चौघांना अटक केली आहे.

याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थांचा साठा, विक्री आणि या व्यवहारातील अन्य संभाव्य सहभागाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह भुसावळ तालुका पोलिसांचा सहभाग होता.

जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, किन्ही एमआयडीसीतील या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थांच्या व्यवहारांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!