गजानन हॉस्पिटल तोडफोड व मारहाण प्रकरणी चार आरोपीवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल !
सावदा (प्रतिनिधी)। सावदा येथील गजानन हॉस्पिटलचे शुक्रवारी दगडफेक व टॉमीने तोड – फोड करीत लाखो रुपयांचे नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा येथील डॉ .सुनील चौधरी यांनी सावदा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की गजानन हार्ट हॉस्पिटल मध्ये शुक्रवारी दि .२३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता इम्रान शेख (वय -२८) नामक रुग्ण कुठल्यातरी प्राण्याच्या चावण्यामुळे गंभीर झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते त्याला तपासले असता त्याचे हृदय व फुफुस काम करीत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला त्याच्या नातेवाईकांना दिला नातेवाईकांनी रुग्णाला तेथून घेऊन गेल्या नंतर काही वेळाने ११.३० वाजता अज्ञात चार तरुण दवाखान्या जवळ आले. त्यांनी हातातील टॉमी तसेच मोठे दगड हॉस्पिटलवर फेकले त्यात त्यांनी दरवाजा, खिडक्या तसेच स्वागत कक्षाचे काउंटरच्या टेबलावरील काचा फोडून प्रचंड नुकसान केले . त्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न मी (डॉ . चौधरी) माझे भाऊ अनिल चौधरी यांनी केला.
मात्र, त्यांनी त्यांचा हात पिरगळून शिवीगाळ केली . तसेच रुग्णालयातील टीव्हीची तोड – फोड केली. तसेच पेशंट तपासणीची गल्ल्यात जमा झालेली फीची रक्कम रुपये चार हजर काउंटर मध्ये हात घालून जबरीने काढून घेतली, यामुळे रुग्णालयातील कर्मचारी, इतर रुग्ण हे भयभीत झाले. आचानक काय घडले हे कोणालाच काही कळले नाही अशी फिर्याद डॉ . सुनील चौधरी यांनी सावदा पोलिसांत दिल्याने महा ,वैद्य ,सेवा ,व्यक्ती व संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान याना प्रतिबंध) व साथीचे रोग आदी कलमांव्यये शेख सादिक शेख शब्बीर, शेख अरबाज शेख रौफ, शेख अजू शेख अय्युब, शाहरुक मेहमूद मन्यांर, चार आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सादर घटनेचा तपास एपीआय राहुल वाघ व कर्मचारी करीत आहेत .

