भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

राजकीय वर्तुळात खळबळ “वयाचा विचार करता आम्ही…”; संकटमोचन गिरीश महाजन राजकारणातून निवृत्ती घेणार?

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी जुलै २०२६ मध्ये चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात वयाचा व ७ टर्मचा विचार करून “कुठेतरी थांबलं पाहिजे” असे म्हणत राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. तसेच, त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यात जिल्ह्याचा भावी नेता असल्याचे स्पष्ट केले.

वयाचा व पदाचा विचार करता सात टर्म पूर्ण झाल्या असून आता आणखी एखादी टर्म होईल, पण स्मशानात जाईपर्यंत पदावर राहणे योग्यबी नाही.ही थांबण्याची वेळ असून कुठे आणि कधी थांबायचे हे समजले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले. पक्षाची धुरा कोणातरी चांगल्या व सक्षम हातात दिली पाहिजे, असे सांगत त्यांनी उत्तराधिकारी म्हणून मंगेश चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख केला.

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव शहरातील विकास कामांच्या कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे ते सक्रिय राजकारणात निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन तसेच विकासकामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी निवृत्ती घेणार असल्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तसेच यावेळी बोलताना दोन्ही मंत्र्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

काय म्हणाले गिरीश महाजन?
“आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे. त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं.” असं वक्तव्य करत गिरीश महाजन त्यांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकासकामांचा धडाका लावला, ते पाहून आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो, अशा शब्दांत महाजन यांनी आमदार मंगशे चव्हाण यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!