भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावद्यात ‘स्पर्श फिजिओथेरपी क्लिनिक’चा २९ जुलैला भव्य शुभारंभ ! अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांसह विविध शारीरिक व्याधींवर उपचार उपलब्ध

आता सावदा शहरातच मिळणार आधुनिक फिजिओथेरपी उपचारांची विश्वासार्ह सेवा!

सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : सावदा शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक सुविधा उपलब्ध होत असून, ‘स्पर्श फिजिओथेरपी क्लिनिक’ चे २९ जुलै २०२६ पासून नवीन, प्रशस्त आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जागेत स्थलांतर होत आहे. नव्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध शारीरिक व्याधींवर फिजिओथेरपी उपचार व पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

क्लिनिकमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, संधिवात, स्लिप डिस्क, सायटिका, हात-पायांना मुंग्या येणे, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स, अर्धांगवायू, फेसियल पाल्सी, फ्रोजन शोल्डर तसेच विविध स्नायूंच्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. याशिवाय दुखापतीनंतरचे उपचार, ऑपरेशननंतरचे पुनर्वसन, गर्भावस्था व प्रसूतीनंतरची फिजिओथेरपी तसेच वजन कमी करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व उपचाराची सुविधाही उपलब्ध असणार आहे.

रुग्णांच्या उपचारासाठी IFT, SWD, Ultrasound Therapy, Traction, Muscle Stimulator, TENS, Manual Therapy आणि Therapeutic Exercises यांसारख्या आधुनिक उपचारपद्धतींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे सावदा व परिसरातील नागरिकांना फिजिओथेरपी उपचारांसाठी आधुनिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

फिजिओथेरपिस्ट डॉ. नम्रता प्रशांत भारंबे (B.P.Th.) यांच्या मार्गदर्शनाखाली क्लिनिकमध्ये उपचार सेवा दिली जाणार आहे. एचडीएफसी बँकेसमोर, स्वामीनारायण नगर, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव येथे हे क्लिनिक सुरू होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!