धक्कादायक; चाळीसगाव मध्ये गोळीबार !
चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील घाट रोड परिसरातील हुडको परिसरात सायंकाळी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील हुडको भागात सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा कंपनीच्या गाडीवर येऊन अचानक गोळीबार केला. यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली तर दुसरी जमिनीवर फायर झाले असून एक गोळी शेख जुगर शेख वसीम या तरुणास मांडीवर लागल्याचे वृत्त असून सदर जखमी करून शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याचे समजत असून गोळीबाराची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करून पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे भरदिवसा चाळीसगाव शहरातील गजबजलेल्या वस्तीत घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाल्याचे दिसत आहे.


