भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले, तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अनेक दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती.मात्र पावसाने कमबॅक करत जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत पुन्हा मोठी वाढ झाल्याने हतनूर धरणाचे १४ दरवाजे १ मीटर ने उघडण्यात आले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केला असून मागच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. यामुळे आज रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी हतनूर धरणाचे १४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आल्यामुळे तापी नदी पात्रात २८ हजार १७५ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. यामुळे तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!