भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

आनंदाचा शिधा योजना बंद, शिवभोजनही बंद पडण्याचे संकेत

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लाडकी बहीण योजनेने आनंदाचा शिधा व शिवभोजन थाळी या योजना अडचणीत आल्या आहेत. आर्थिक तरतूद नसल्याने या दोन्ही योजना आगामी काळात बंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे शासकीय तिजोरी वरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे आनंदाचा शिधा या योजनेला फटका बसल्याचे सांगितले जात असून ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा दिला जाणार नाही.

दिवाळी, गुढीपाडवा यांसारख्या सण-उत्सवाप्रसंगी ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जात होता. मात्र आता या योजनेला लाडकी बहिण योजनेच्या आर्थिक भरामुळे शासकीय तिजोरीवर ताण पडला असल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेशन दुकानांमधून अवघ्या शंभर रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, हरभराडाळ, तेल व रवा उपलब्ध करून दिला जात होता. राज्यातील कोट्यवधी रेशनकार्डधारकांना याचा फायदा होत होता. त्यामुळे अल्पावधीत ही योजना जनतेच्या पसंतीस उतरली होती. मात्र आता ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे शासकीय तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शिवभोजन थाळी

२६ जानेवारी २०२० पासून राज्यात गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी देण्याची योजना सुरू केली लाभार्थ्यांकडून दहा रुपये घेण्यात येत असून चाळीस रुपये राज्य सरकारचे अनुदान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. याशिवाय निर्धारित लाभार्थी संख्येपेक्षा अधिक लाभार्थी येतात.

मात्र लाडकी बहिण योजनेच्या आर्थिक भरामुळे आनंदाचा शिधा या योजने सह शिवभोजन थाळी ही योजनाही बंद करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!