भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळशैक्षणिकसामाजिक

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज |नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सरला सावकारे व नाना पाटील यांनी लोकमान्य टिळक तसेच क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या प्रेरणादायी कार्याची व देशसेवेची महती विद्यार्थ्यांना सांगितली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात वेळेचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी, विज्ञाननिष्ठ विचार जोपासावेत, पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि आपल्या देशाचे जबाबदार व प्रामाणिक नागरिक बनावे. हेच लोकमान्य टिळकांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “आज या पवित्र दिनी आपण सर्वांनी देशप्रेम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट शिक्षणाचा संकल्प करूया.” यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप साखरे यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!