भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यातील ३०८ जण ५ दिवसांसाठी हद्दपार

रावेर.मंडे टु मंडे न्युज | गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संभाव्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ३०८ जणांना पाच दिवसांसाठी रावेर शहर व तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावानुसार दिनाक २२ ते २७ पर्यंत याना बंदी असणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शांतता भंग होऊ नये,शांततामय वातावरणात निर्विघ्नपणे मिरवणूक पार पडण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!