भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमफैजपूरयावल

यावल तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचे अपहरण ; फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

फैजपूर ता. यावल.मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी || तालुक्यातील हिंगोणा येथे ५५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्यांना आमिष दाखवून फूस लावत पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोणा येथील बेघर प्लॉट वस्ती परिसरात राहणाऱ्या सुनीता सुनील इंधाटे (वय ५५) या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना काहीतरी आमिष दाखवून फूस लावल्याची तक्रार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना पळवून नेल्याचे तसेच कुठेतरी डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

महिला बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व संबंधितांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्या मिळून न आल्याने सुनील आनंदा इंधाटे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहेत.बेपत्ता महिलेचा शोध घेण्याचे तसेच घटने मागील नेमके कारण स्पष्ट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!