लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जळगाव. मंडे टु मंडे न्युज | | लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पारोळा तालुक्यातील
सावखेडा होळ येथे घडली
पारोळा पोलिसांच्या अहवालानुसार, अल्पवयीन पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी मच्छिंद्र ईश्वर ठाकरे (रा. सावखेडा होळ, ता. पारोळा) याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तक्रारीत आरोपीने पीडित मुलीला धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहे


