भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव मध्ये कुंटणखान्यावर छापा,पाच महिलांची सुटका,तीन ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

एमआयडीसी परिसरातील नीलंबरी हॉटेलच्या मागे आणि हॉटेल सुनील सिंगच्या समोर एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. एसडीपीओ नितीन गनापुरे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला. त्यात या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेली एक महिला आणि दोन पुरुष आरोपींना पोलिसांनी पकडले.
एसडीपीओ गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगिता नरखेडे, पोलिस कॉन्स्टेबल अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव, रवींद्र मोतीराया, नीलेश जगताप आणि प्रणय पवार यांनी ही कारवाई केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.


सदरची कारवाई एसडीपीओ गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगिता नरखेडे, पोलिस कॉन्स्टेबल अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव, रवींद्र मोतीराया, नीलेश जगताप आणि प्रणय पवार यांनी ही कारवाई केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!