भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

राज्य उत्पादन शुल्क च्या दुय्यम निरीक्षकासह पंटरला लाच घेताना रंगेहात अटक, रावेर तालुक्यातील प्रकार

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | कारवाई करणार नाही त्या बदल्यात दहा हजारांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरिक्षकाला खासगी पंटरसह जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार दिनाक १७ डिसेंबर रोजी रात्री रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने धडक कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी खात्याचे दुय्यम निरिक्षक विजय पाटील आणि त्यांच्या खासगी पंटर भास्कर चंदनकर यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.

यातील तक्रारदाराच्या वडिलांच्या विरूध्द आधीच राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने कार्यवाही केली होती. या प्रकरणात पुढील कारवाई न करण्यासाठी विजय पाटील यांनी दहा हजार रूपयांची लाच मागितली होती. संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

त्या नुसार लाचलुचपत पथकाने सापळा रचला. रावेर तालुक्यातील खानापूर येथे लाचेचे दहा हजार रूपये विजय पाटील यांनी भास्कर चंदनकर याच्याकडे देण्याचे तक्रारदाराला सांगितले. यानुसार चंदनकरने दहा हजार रूपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. यानंतर विजय पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने केली. विजय पाटील हे राज्य उत्पादन शुल्कच्या रावेर तालुक्यातील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!