भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

भरधाव वाळू डंपर ची दुचाकीला धडक, दोघांचे पायावरून चाक गेल्याने दोघे गंभीर जखमी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |  नशिराबाद येथील दोन जण जळगाव एम आय डी सी मध्ये कंपनीत कामाला जात असताना त्याच्या दुचाकीला वाळूच्या डंपर ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा असलेल्या दोघांच्या पायावरून डंपर गेल्याने पाय निकामी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज १६ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील किरण चौधरी व धांडे हे दोघे जळगाव एम आय डी सी मध्ये स्टार फेब्रिकेटर का कामाला असून आर्यावर्त केमिकल जवळ MH 19 CY 7796 क्रमांकाच्या वाळूच्या खाली असलेल्या डंपर ने
MH 19 DB 0157 या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात नशिराबाद येथील किरण चौधरी व धांडे ( पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या पायावरून डंपरचे चाक गेले. दोघे जखमींना लागलीच दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हे डंपर आव्हाने येथील असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!