Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

शेळगाव बॅरेज मध्ये मासेमारी साठी गेलेला नशिराबाद येथील तरुण गेला वाहून

यावल,मंडे टु मंडे न्युज | नशिराबाद येथील दोन तरुण जळगाव-यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदी पात्रातील  शेळगाव शेळगाव बॅरेज परिसरातील तापी नदीपात्रात मासेमारीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण खोल पाण्यात बुडून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सिराज टेलर असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले.

नशिराबाद येथील सिराज टेलर हा त्याचा मित्र अन्सार शेख याच्यासोबत रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शेळगाव बॅरेज परिसरात मासेमारीसाठी आला होता. मासेमारी करताना सिराज हा तापी नदीच्या पात्रातील पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात बुडाला.याचवेळी बॅरेजमधून पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रात प्रवाह वाढलेला होता. सिराज हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना नागरिकांच्या समोरच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.


घटनेची माहिती अन्सार शेख यांनी नशिराबाद येथे दिल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर सिराजचा नदीपात्रात शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नाही.
सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, सिराजचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिराजच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!