राज्यभरात थंडीचा कडाका, गारठा वाढणार, हवामान विभागाचा मोठा इशारा, धुळे ६ तर जळगाव, नाशिक १० अंश सेल्सिअस
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढताना बघायला मिळत आहे. थंडी चांगलीच वाढली असून भारती हवामान विभागाने थंडीच्या कडाक्या संदर्भात मोठा इशारा दिला आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली.
राज्यासह देशात कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे गारठा वाढल्याने राज्यात शीत लहरी येत असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. संपूर्ण महिनाभर अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला राज्यात पाऊस होता. ऐन दिवाळीमध्येही पाऊस पडत होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात गुलाबी थंडी सुरू झाली. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा जारी केला. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात ६ अंश सेल्सिअस तापमान होते. धुळ्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. जेऊर आणि निफाडमध्ये पारा घसरला. ६ च्या आसपास तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडे थंडी वाढत असल्याने राज्यातही थंडी वाढली आहे. मालेगाव, आहिल्यानगर, गोदिंया येथे ९ अंश सेल्सिअस तापमान होते. पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे १० अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईतही थंडी वाढली असून १५ अंशांच्या आपसास तापमानाची नोंद झाली. 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, राज्यात पुढील काही दिवस थंडी असणारच आहे. भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
