भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण, परिसरात खळबळ

यावल. मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथून ३५ वर्षीय तरुणाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. महेश सुधाकर मोरे (वय ३५, रा. किनगाव बुद्रुक) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महेश मोरे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून त्यांना कुठेतरी डांबून ठेवल्याची फिर्याद देण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व परिचितांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही ते मिळून न आल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.
याप्रकरणी दीपक सुधाकर मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत. अपहरणामागील कारण आणि तरुणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!