Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

शालार्थ घोटाळा : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ! जळगाव जिल्ह्यातील ६५० हून अधिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्दचे आदेश ; शिक्षकांसह संस्था चालकांना नियुक्तीचे पुरावे व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

जळगाव | मंडे टु मंडे न्यूज ||राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. जिल्ह्यातील ६५० हून अधिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश संबंधितांना प्राप्त झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सुनावणीत संबंधित संस्थाचालकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक आणि संस्थाचालकांसमोर आता नियुक्ती व मान्यतेचे पुरावे सादर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान शिक्षण विभागाकडून संस्थाचालकांसह संबंधित शिक्षकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियुक्ती प्रक्रिया, वैयक्तिक मान्यता आणि सेवेसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून, कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.


दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील ६५० हून अधिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर संबंधित प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. यावेळी संस्थाचालकांना १७ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच संबंधित शिक्षकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, यासाठी १७ व १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीसाठी संबंधित शिक्षकांनी नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता आदेश, सेवासंबंधी कागदपत्रे तसेच नियुक्ती प्रक्रिया नियमानुसार झाल्याचे सिद्ध करणारे उपलब्ध पुरावे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या मान्यतेबाबत आणि पुढील प्रशासकीय कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.


शालार्थच्या सर्व फाइल्सची तपासणी अंतिम टप्प्यात
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाच्या अनुषंगाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील संस्थांच्या सर्व फाइल्सची तपासणी करण्याचे निर्देश एसआयटीकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या आठवडाभरापासून शिक्षण विभागाकडून शेकडो फाइल्सची छाननी सुरू आहे. या तपासणीत अनेक फाइल्समध्ये त्रुटी आढळल्याचे समजते. अशा त्रुटीपूर्ण फाइल्स पुढील पडताळणी आणि निर्णयासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.


एकीकडे ६५० हून अधिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश, तर दुसरीकडे नियुक्तीचे पुरावे सादर करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष आता १७ आणि १८ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लागले आहे. या सुनावणीनंतर शालार्थ घोटाळ्यातील कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आ

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!