Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

फैजपूरयावल

फटाके फोडण्यावरून वाद ; २२ वर्षीय तरुणाला काठीने मारहाण करत ठार मारण्याची धमकी

फैजपूर. मंडे टु मंडे न्युज || यावल तालुक्यातील बामणोद येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका २२ वर्षीय तरुणाला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत करण्यात आली. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामणोद येथील विकास दूध डेअरीसमोर फटाके फोडत असल्याच्या कारणावरून चेतन किशोर भिरूड (वय २२) आणि उमेश केदारे यांच्यात वाद झाला. यावेळी उमेश केदारे यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करत चेतन भिरूड यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच लाकडी काठीने हातापायांवर मारून दुखापत केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी चेतन भिरूड यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात उमेश केदारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!