भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता २ हजारांची लाच घेताना रंगेहात एसीबी च्या जाळ्यात

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | महावितरण कंपनीकडे ऑनलाईन पध्दतीने सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळणेकामी दोन हजारांची लाच घेताना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( वर्ग १) भुसावळ कार्यालय नितीन अभिमन्यू पाटील (वय ४९ वर्ष) यांना २ हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली. या घटनेने महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसवण्याची एजन्सी असुन त्याअंतर्गत त्यांच्याकडुन भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केल्याने त्यांचेतर्फे तक्रारदार यांनी महावितरण कंपनीकडे ऑनलाईन पध्दतीने सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळणेकामी अर्ज सादर केले होते. सदरची प्रकरणे तपासुन त्यांना रिलीज ऑर्डर देण्याचे काम हे अभियंता नितीन अभिमन्यु पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग १), भुसावळ शहर १ महावितरण कार्यालय, भुसावळ यांच्याकडे होते. नमुद प्रकरणामध्ये मंजुरी व रिलीज ऑर्डर न मिळाल्याने आज दि.२२/०७/२०२६ रोजी तक्रारदार हे नितीन पाटील अभियंता यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता, नितीन पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक प्रकरणाकरीता १,०००/- रूपये प्रमाणे २ प्रकरणांचे २,०००/- रूपयांची लाचेची मागणी केली होती. सदर बाबत तक्रारदार यांनी ला.प्र.वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २२.०७.२०२६ रोजी सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक नितीन अभिमन्यु पाटील, पद- अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग १) यांनी तक्रारदार यांच्याकडे एकुण २ सोलर सिस्टीम बसविण्याची परवानगी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी २,०००/- रूपयांची मागणी करून ती स्विकारण्यास पंचासमक्ष समंती दर्शवुन यशस्वी सापळा कारवाईदरम्यान नितीन अभिमन्यु पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडुन २,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्या नुसार भुसावळ शहर १ महावितरण नितीन अभिमन्यु पाटील, वय ४९ वर्ष, पद- अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग १), कार्यालय, भुसावळ याच्या विरूध्द भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा कारवाई पर्यवेक्षण अधिकारी – श्री. योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प जळगांव. सापळा पथक श्रेणी पोउनि/सुरेश पाटील, मपोहेकों/संगीता पवार, पोहेकॉ/बाळु मराठे, सर्व नेमणुक – ला.प्र.वि. जळगांव. यांनी यशस्वी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!