भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे अजित पवार गटाच्या नेत्याचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुळे युतीचा विचार सोडून स्वतंत्र लढाईसाठी तयारी करण्याचे आवाहन केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. व कामाला लागण्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, युतीचं कस जमलं तर करायला पाहिजे, नाही तर सोडून दिलं पाहिजे. असं आमचं धोरण ठरल्याचही पटेल म्हणाले.

एसी वर्ग मोठा आहे? मुस्लिम वर्ग मोठा आहे? हेही लक्षात ठेवून घड्याळाला इतरांपेक्षा मतदान जास्त मिळतील ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या ताकदीच्या हिशोबाने मिळत असेल, तर आपण विचार करू.
घड्याळाला मतदान करणारा वर्ग थोडा भिन्न आहे. आपल्याला ते मिळू शकते. त्यामुळे हाही विचार करायला हवा….. त्यावर आपण अंतिम निर्णय घेऊ.! असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आपले कोणी शत्रू नाही. आपला पक्ष वाढवायला संकोच करायचं नाही. दुसऱ्या पक्षाचा कोणी येत असेल तर त्यांना घ्या वेलकम करा, असा कानमंत्रही प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना बैठकीदरम्यान दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!