भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

गाणं गायलं म्हणून तहसीलदार निलंबित, पण आंदोलक शेतकऱ्याला लाथ मारणाऱ्या DYSP वर कारवाई कधी?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तहसीलदाराची नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापूर येथे बदली झालेल्या तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभादरम्यान शासकीय खुर्चीत बसून त्यांच्याच निरोप समारंभात “याराना” या चित्रपटातील सोबतच्या कर्मचाऱ्यांना मैत्रीचा संदेश देणारे “तेरे जैसा यार कहा ” हे गाणं गायलं. थोरात या तहसीलदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.

सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये थोरात हे विविध अंगविक्षेप व हातवारे करताना दिसत असून, त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही, असे म्हणत तहसीलदार महोदयांचे निलंबन करण्यात आल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. जिल्हाधिकारी नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित केले.

इतरही शासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. मात्र पण लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कधी असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आंदोलक शेतकऱ्याला लाथ मारणाऱ्या DYSP वर कारवाई कधी?
पण, एका आंदोलक शेतकऱ्याला जालन्यातली डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनीही वर्दीत असताना चक्क सिनेस्टाईल लाथ मारली होती. पायात बूट अन् अंगात वर्दी असतानाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची ही वागणूक नेटीझन्सनसह काही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही खटकली होती. त्यामुळे, या महोदयांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

त्याच, अनुषंगाने महसूलमंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी माहिती घेऊन कारवाई करतो, असे उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र, केवळ गाणं म्हणणाऱ्या तहसीलदारांवर तातडीने कारवाई होते, पण लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालतंय का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!