भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

नशिराबाद मध्ये सेवाभावाचा आदर्श ; मोफत दंत तपासणी शिबिरातून ७० नागरिकांना आरोग्याचा दिलासा

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथे समाजसेवेची भावना जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक स्तुत्य उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. प्रभा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंत तपासणी व सल्ला शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये नशिराबादसह परिसरातील सुमारे ७० नागरिकांची मोफत दंत व मुख आरोग्य तपासणी करण्यात आली.

न्यू इंग्लिश स्कूलसमोरील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे शिबिर पार पडले. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उपस्थितांनी दंत आरोग्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले.

अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन
प्रसिद्ध रूट कॅनल तज्ज्ञ डॉ. युवराज रोटे (B.D.S., M.D.S.) आणि डॉ. हरीश काळे यांनी शिबिरात सहभागी रुग्णांची सखोल तपासणी केली. दातांच्या विविध समस्या, तोंडाच्या आजारांपासून बचाव, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक उपचार पद्धतींबाबत त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी विशेष सवलतीचे डिस्काउंट कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सामाजिक कार्याला मान्यवरांची दाद
या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शहराध्यक्ष रोहिदास बाबा गणेश चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, तसेच स्वामी केंद्रप्रमुख देविदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिबिरादरम्यान नागराज महाजन आणि डॉ. प्रमोद आमोदकर यांनी सदिच्छा भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. समाजहितासाठी राबविण्यात येणारे असे आरोग्यदायी उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी परिवार, नशिराबाद आणि आयोजक टीमच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये पवन मराठे, पूर्वेश येवले, हितेश पाटील, युवराज मराठे, सचिन घोडकर, रोहन महाजन, जयेश पाटील, शुभम भावसार, तुषार रंधे, महेंद्र मराठे, अजय राणे, निलेश सुतार आणि प्रवीण मिस्तरी यांनी सक्रिय सहभाग घेत शिबिराचे नेटके नियोजन व व्यवस्थापन केले. या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दंत आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून, परिसरात या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!