भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावधार्मिक

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन, विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. संस्थेचे सदस्य व नगरसेवक श्री. पियुष कोल्हे तसेच सौ. भाविका कोल्हे यांच्या हस्ते गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यालय परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

गणरायाच्या स्वागतासाठी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने आकर्षक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थिनींनी केलेल्या लेझीम सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात समुहनृत्य, लोकनृत्य, भावगीत,फॅन्सीड्रेस, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्याचप्रमाणे मनोरंजनात्मक खेळ गाढवाला शेपुट लावणे, बादलीत चेंडू टाकणे, रस्सी खेच अशा विविध स्पर्धांचे व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी विदयालयाचे चिटणीस श्री अवधुत पाटीलसर उपचिटणीस श्री एम व्ही खड़के मुख्याध्यापक श्री व्ही आर कोल्हे उपमुख्याध्यापक श्री सी व्ही येवले पर्यवेक्षक बी बी देवरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सांस्कृतिक जाणीव, संघभावना आणि क्रीडाभावना रुजविण्याचा उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!