भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ हादरले! ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या ; अल्पवयीन मुलाने पाठीमागून केले सपासप वार, हल्लेखोर ताब्यात

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज |जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलाने पाठीमागून येत चाकूने सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५) असे आहे. ते भुसावळ येथील समतानगर परिसरातील रहिवासी असून रेल्वेच्या एम.ओ.एच. शेडमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. भुसावळ, जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे भुसावळ रेल्वे कॅन्टीनमध्ये काम करत होते. रात्री तुषार हा परिचिताची दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1405) घेवून पाटीलमळा भागातून जात असताना अल्पवयीन संशयीताशी त्याचा कुठल्यातरी कारणातून वाद झाला व संशयीताने पाठीमागून डोक्याखाली व पाठीवरील भागात चाकूचे सपासप वार केल्याने अतिरक्तस्त्रावाने जागीच तरुणाचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि संशयित कोण, याबाबत पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!