रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा ! एका सदस्याच्या अपात्रतेमुळे संपूर्ण कुटुंबाचे धान्य बंद होणार नाही! राज्य अन्न आयोगाची सरकारला महत्त्वपूर्ण सूचना!
मुंबई. मंडे टु मंडे न्युज || राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकाच रेशनकार्डवरील एखादा सदस्य अपात्र ठरला, तरी त्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबाचे मोफत धान्य बंद करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज्य अन्न राज्य अन्न आयोगाने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे पात्र रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पर्याय कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असेल किंवा तिच्या नावावर चारचाकी वाहन असेल, तर त्या एका सदस्याच्या अपात्रतेमुळे कुटुंबातील उत्तर पात्र सदस्यांना धान्याच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी आयोगाची भूमिका आहे.

प्रत्यक्ष पडताळणी करण्यावर भर
केवळ ऑनलाइन माहिती किंवा तांत्रिक निकषांच्या आधारे संपूर्ण कुटुंबाचे रेशन बंद करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन परिस्थितीची पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कुटुंबातील पात्र आणि अपात्र सदस्यांची स्वतंत्रपणे तपासणी करून निर्णय घेण्यावर आयोगाने भर दिला आहे.

पात्र सदस्यांना स्वतंत्र रेशनकार्डाचा पर्याय
कुटुंबातील एखादा सदस्य अपात्र ठरत असल्यास इतर पात्र सदस्यांना स्वतंत्र रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे एका एका सदस्याच्या अपात्रतेची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागणार नाही.

बंद झालेले धान्य पूर्ववत सुरू करण्याची सूचना
अपात्रतेच्या कारवाईमुळे पात्र नागरिकांचे धान्य बंद झाले असल्यास संबंधित प्रकरणांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांचे धान्य तातडीने पूर्ववत सुरू करण्याबाबतही आयोगाने सूचना दिल्या आहेत.



रेशनकार्ड धारकांनी काय करावे? • धान्य बंद झाले असल्यास संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. पात्र सदस्यांची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
• धान्य बंद करण्याचा निर्णय चुकीचा वाटत असल्यास लेखी तक्रार दाखल करावी.
• आवश्यक असल्यास स्वतंत्र रेशनकार्डासाठी अर्ज करावा.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

