भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

ब्रेकिंग : भुसावळ शहर गोळीबाराने हादरले ; लुटीच्या प्रयत्नातून तरुणावर गोळीबार

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एकावर गोळीबार केल्याची घटना समोर आली. दुचाकीवर आलेल्या चौघांनी एका टपरीवरील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करून बचावासाठी टपरीचालकाने हल्लेखोरांवर तीक्ष्ण हत्याराने वार केला. प्रत्त्युत्तरात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या टपरी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील जळगाव रोडवरील जुना सातारा भागात खळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिवछत्रपती बेंजो ग्रुप फलकाजवळ असलेल्या टपरीवर दुचाकीने तोंडाला रुमाल बांधून चौघे जण आले. त्यांनी त्या टपरीमधील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. तेथे असलेले उल्हास पाटील यांनी विरोध केला. यात हल्लेखोरांनी पाटील यांच्यावर गोळीबार केला. छातीला गोळी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरा लुटीच्या उद्देशाने झालेल्या झटापटीनंतर तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत उल्हास गणेश पाटील (वय ३९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे अतिदक्षता उपचार सुरू आहेत.

भुसावळहून खळवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या स्व. नारायण पाटील व्यापारी संकुलाजवळ एक पानटपरी आहे. या टपरीच्या आडोशाला उल्हास पाटील उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघा संशयितांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्याकडील रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी विरोध केल्याने संशयितांपैकी एकाने सोबत आणलेल्या देशी कट्ट्यातून गोळी झाडली.

ही गोळी उल्हास पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबारानंतर परिसरात प्रचंड घबराट पसरली आणि नागरिकांमध्ये पळापळ उडाली. घटनेनंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.गोळीचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना प्रथम शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी जळगाव येथे हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत संशयितांचा कसून शोध सुरू होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी व्यक्त केला आहे.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!