ब्रेकिंग : ७१ हजार ७०० रुपये लाच घेताना भूकरमापक, व डेटा एंट्री ऑपरेटर जळगाव एसीबी च्या ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | शेतीचे गट हिस्सा व पोट हिस्सा याची पडताळणी व मोजणी करण्यासाठी ७१ हजार ७०० रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने राहुल ताराचंद कोळी, वय-३२, भूकरमापक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव. (वर्ग-३) व कल्पेश सोमनाथ पाटील, वय ३२ वर्ष, डेटा एंट्री ऑपरेटर, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव, (कंत्राटी) याना रंगेहात अटक केली. या घटनेने उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव मध्ये मोठी खळबळ उडाली.
अधिक माहिती अशी की, यातील मूळ तक्रारदार ४९ वर्षीय पुरुष यांनी तक्रार दिली की त्यांची राहते गावाचे शिवारात गट क्रमांक ०६ मध्ये शेती असून सदर शेतीचे गट हिस्सा व पोट हिस्सा याची पडताळणी व मोजणी करण्यासाठी उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव यांच्याकडे अर्ज करून शासकीय चलन भरले होते. राहुल ताराचंद कोळी, वय-३२, भूकरमापक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव. (वर्ग-३) यांनी तक्रारदार यांचे भावाचे उपस्थितीत ७०,०००/- मागणी केली या बाबत तक्रारदार यांनी लाप्रवि जळगाव येथे दि. १७/०७/२०२६ रोजी तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. १७/०७/२०२६ रोजी उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव येथे पंचांचे उपस्थितीत पडताळणी केली असता राहुल कोळी भूकरमापक उपअधीक्षक यांनी दि.२९/०७/२०२६ रोजी मोजणीच्या दिवशी बोलू असे सांगितले होते तर २ कल्पेश सोमनाथ पाटील, वय ३२ वर्ष, डेटा एंट्री ऑपरेटर, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव, (कंत्राटी) यांनी मोजणीच्या नोटिस पाठवण्यासाठी स्टॅम्प फीकरीता ६२५/- रुपयांची मागणी केली.
तसेच आज दि.२९/०७/२०२६ रोजी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्या शेतीची मोजणी करण्यासाठी आरोपी हे खाजगी मदतनीस घेवून शेतात आले असता तक्रारदार यांच्या शेतीची मोजणी/ पडताळणी करून तक्रारदार यांना बस स्टॉपजवळ पुढची बोलणी करण्याकरिता बोलावले. म्हणून तक्रारदार हे पुन्हा त्यांचे भावासह व पंचासह राहुल कोळी भूकरमापक यांना भेटले असता यांनी स्वतःसाठी व ऑफिसच्या नावे ७०,०००/- रुपयांची मागणी व दोन वेळेस नोटिस पाठवल्या म्हणून त्याचे १२००/- रू व खाजगी मदतनीस याचेसाठी ५००/- रुपये अशी एकूण ७१,७००/- रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वतः स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्या नुसार सापळा कार्यवाही आज दि.२९/०७/२०२६ रोजी करंज, ता. जि. जळगाव येथील बस स्टॉप येथे आरोपी राहुल कोळी, भूकरमापक यांनी मागणी केलेली ७१,७००/-रूपये लाचेची रक्कम स्वतः पंचांसमक्ष स्विकारली आहे.
या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, ७अ प्रमाणे
१ )राहुल ताराचंद कोळी, वय-३२, भूकरमापक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव. (वर्ग-३)
२ ) कल्पेश सोमनाथ पाटील, वय ३२ वर्ष, डेटा एंट्री ऑपरेटर, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव, (कंत्राटी) यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीस ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल होताच अटकेबाबतची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प जळगाव. श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., जळगाव . पोउपनिरी/सुरेश पाटील, पोहवा/संगीता पवार, पोकों/प्रदीप पोळ, पोकों/भूषण पाटील, पोकों/मनोज पाटील. यांनी श्री भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक श्री प्रदीप मैराळे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. श्रीमती कविता फडतरे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली केली.


