ब्रेकिंग : रावेर-यावल, मुक्ताईनगर तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये खळबळ!
रावेर, मंडे टु मंडे न्युज ||आज सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास रावेर आणि यावल ,मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. असे जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.
आज सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास १ ते १.५ सेकंद जाणवले धक्के; सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही.
रावेर तालुक्यातील सावदा, रावेर, ऐनपूर, मोठा वाघोदा, खिर्डी यांसह परिसरातील विविध गावांमध्ये तसेच यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. साधारण एक ते दीड सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू, तीव्रता आणि नेमकी कारणे याबाबत अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.


