ब्रेकिंग : भुसावळ येथील पोलिस उपनिरीक्षक ३० हजारांची लाच प्रकरणी जळगाव एसीबी च्या जाळ्यात
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे (पीएसआय) आणि त्याचा खासगी पंटर सलीम हकीम कुरेशी याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, मुळ तक्रारदार व त्यांचा मित्र यांचे एका इसमासोबत दि. २८.०३.२०२६ रोजी सांयकाळी खडका चौफुली भुसावळ येथे तकारदार यांनी उधार दिलेले पैसे परत मागत असतांना किरकोळ मारामारी झाली होती. त्यावरुन तक्रारदार व त्यांचा मित्र यांच्याविरुध्द भुसावळ बाजारपेठ पो.स्टे येथे सदर इसमाने गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर तक्रारदार यांना सदर गुन्हयात अटक न करण्याच्या मोबदल्यात ३०,०००/-रूपये दयावे लागतील, अशी मागणी पीएसआय सांगळे हे तक्रारदार यांच्या पत्नीकडे करीत असल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. ०७.०४.२०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव यांचेकडे श्री. सांगळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक-भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, जळगाव व सलिम चाचा, रा. बोदवड खाजगी इसम यांचेत्रिरूध्द लाच मागणी केल्याची तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि. ०७.०४.२०२६ रोजी लाचमागणी पंचासमक्ष पडताळणी केली असता सलिम कुरेशी (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयात अटक न करता केवळ चॅप्टर केस करुन सोडण्याचे मोबदल्यात श्री. सांगळे साहेब यांच्यासाठी ३०,०००/- रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी श्री सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांची भेट घेतली असता यांनी तकारदार यांच्याविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात अटक न करता केवळ चॅप्टर केस करून सोडण्याचे मोबदल्यात तडजोडीअंती २०,०००/- रूपयांची मागणी करुन स्विकारण्यास संमती दर्शवुन सदरची लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला,
यासंदर्भात राजु सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, जळगाव.वर्ग-२ आणि
सलिम हकीम कुरेशी, वय ४६ वर्ष, धंदा मंजुरी, रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड, जि. जळगांव यांचेवर भुसावळ बाजारपेठ पो.स्टे., गु.र.नं. २८०/२०२६. गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगांव. श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगांव, श्रेणी पोउनि /दिनेशसिंग पाटील, श्रेणी पोउनि/सुरेश पाटील, पोकों/अमोल सुर्यवंशी, पोकों/भुषण पाटील, पोकों/राकेश दुसाने, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, सर्व नेमणुक ला.प्र.वि. जळगांव. यांनी यशस्वी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
